Wednesday, 2 August 2023

Thursday, 22 June 2023

मराठावाड्यातील या जिल्ह्यातील,पाऊसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 763कोटी 68लाख रु मद्दत वितरित होणार! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नाहीत पैसे? Nuksan Bharpai 2022

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून 763 कोटीची मदत!
Nuksan Bharpai 2023

👳‍♀️नमस्कार शेतकरी बंधुनो राज्य सरकारने खरीप हंगाम 2022मध्ये झालेल्या नुकसान भरपाई ची मद्दत म्हणून मराठावाड्यातील शेतकऱ्यांना विशेष अनुदान जाहीर केले आहे.

💁‍♂️मागे दिलेल्या नुकसान भरपाई ची रक्कम मराठावाड्यासाठी तटपुंजी रक्कम होती. त्यामुळे मागे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी विशेष पॅकेज जाहीर केले. त्यात त्यांनी मराठावाड्यासाठी 768.63कोटी रुपयांची मद्दत जाहीर केली.

🕵‍♀️मराठावाडयातील नुकसान भरपाईतुन नांदेड, लातूर, आणि हिंगोली या तीन जिल्ह्याला वगळन्यात आले आहे हे विशेष.

🤔नांदेड जिल्ह्यात  सर्वाधिक अतिवृष्टी नुकसान होऊनही नांदेड जिल्ह्याला वगळण्यात आले.

💁‍♂️नांदेड,लातूर, हिंगोली या तीनही जिल्ह्यात नुकसान होऊन वगळंण्यात आले आहे.

💁‍♂️मागील वर्षीच्या पावसाळी हंगामात अति पावसाने नुकसान झालेल्या पाच जिल्ह्यातील बारा लाख 73 हजार शेतकऱ्यांना 763 कोटी 68 लाख रुपये याची मदत शासनाने वितरित केली असूनही ही मदत शेतकऱ्यांना च्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे.

📅जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीत जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे पिकाचे नुकसान झाले होते अतिवृष्टीची नोंद झालेल्या महसूल मंडळात येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना मदत दिली जाते मात्र महसूल मंडळ वगळता एखाद्या गावात अतिवृष्टी होऊन नुकसान होऊ शकते ही बाब लक्षात घेऊन अतिवृष्टीच्या निकषा बाहेरील नुकसान झालेल्या शेती पिकाच्या मदतीसाठी राज्य शासनाने मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

💁‍♂️त्यात मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील 12 लाख 73 हजार शेतकऱ्यांसाठी 763 कोटी 68 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. हा निधी जिल्हाधिकाऱ्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

👉मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक 226 कोटी 98 लाख 91 हजार रुपयाची मदत निधी प्राप्त झाला आहे. त्यात खालोखाल बीड जिल्ह्याला 195 कोटी 3 लाख 27 हजार रुपये, जालना 134, कोटी 22 लाख रुपये 28000हजार, उस्मानाबाद 137 कोटी 7 लाख 58हजार आणि परभणी जिल्ह्यासाठी 79 कोटी 37 लाख 32हजार रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे.

💁‍♂️निकषाबाहेर जाऊन मदत:-
अतिवृष्टी ही शासनाने घोषित केलेली आपत्ती आहे.महसूल मंडळामध्ये उपलब्ध करून दिलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये 24तासात 65मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्यास मंडळातील सर्व गावातील पीक नुकसानीचे पंचनामे केले जातात
                     

                                         👇👇👇👇👇👇

                          हेही वाचा :-आता पिक विमा फक्त 1रुपयात येथे पहा?

🤔तीन जिल्ह्याला वगळले:-

👨‍🌾मागील वर्षीच्या पावसाळ्यात नांदेड हिंगोली जिल्ह्यात अनेक वेळा काही गावांमध्ये अतिवर्षट्टी झाली.काही गावामध्ये अतीवर्षट्टी नोंद मंडळाच्या नोंदीत नाही मात्र त्याची दखल घेतली नाही.

👉पिकांचे नुकसान झाले असतानाही नांदेडसह हिंगोली लातूर जिल्ह्यांना या मदतीपासून वगळण्यात आली आहे

 💁‍♂️ 33टक्के पेक्षा अधिक नुकसान असल्यास मदत दिली जाते. मात्र महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद असतानाही मंडळातील गावांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते ही बाब ग्राह्य धरून मद्दत देण्यात आली आहे.

💸मद्दत निधी जिल्ह्यानुसार ?

➡️    औरंगाबाद  :-226.98 कोटी

➡️    बीड           :-195.03कोटी

➡️    जालना      :-134.22कोटी

➡️    उस्मानबाद :-137. O7कोटी

➡️    परभणी     :-70.37कोटी
  
💰    एकूण        :-763.68कोटी


💁‍♂️हा निधी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा-अधिकारी यांना सुपूर्द करण्यात आला आहे. हा निधी येत्या 4-8 दिवसात सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

👉या मद्दती मुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाच वातावरण निर्माण झालं आहे. ह्या मद्दती मुळे शेतकऱ्यांना खते -बियाणं घेण्यासाठी मद्दत होणार आहे. सरकार च्या ह्या मद्दत मुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

💥ह्या पोस्ट ला इथे शेअर करा 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

Monday, 19 June 2023

टपाल खात्याची खास महिला सन्मान बचत पत्र योजना ! एका महिलेच्या नावावर 2 लाखपर्यंत कितीही बचत पत्र घेता येणार Mahila Sanman Saving Certificate -2023

महिला सन्मान बचत पत्रात करा गुंतवणूक मिळेल चक्री वाढ व्याज! Mahila Sanman Saving Certificate -2023




👮 केंद्र सरकारची डाक कार्यालयामार्फत नवीन बचत योजना सुरू

💁‍♂️नमस्कार, बंधू आणि भगिनींनो ही योजना केंद्र सरकारने आणली आहे तरी ही योजना आपल्या महिला भगिनी साठी खूप महत्वाची आहे.

💁ही योजना फक्त महिला साठी आहे. विशेष म्हणजे या योजनेतून परतवा जास्त असल्याने प्रत्येक महिलेने याचा अवश्य लाभ घ्यावा. ही योजना आपल्या पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध आहे.

💁महिलांच्या सक्षमिकारणासाठी आणि महिलांच्या आर्थिक गुंतवणूक वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने महिला सन्मान बचत पत्र योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत डाक कार्यालयात आर्थिक गुंतवणूक केल्यास वार्षिक 7.5% व्याज मिळणार आहे शिवाय हे व्याज चक्रवाढ पद्धतीने असणार आहे त्यामुळे महिलांना आर्थिक लाभ होणार हे मात्र नक्की आहे.

💁महिलांचे सक्षमीकरण व्हावे म्हणून शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचा महिलांना चांगला लाभ होत असल्याचे  पहावयास मिळत आहे.

🏠केंद्र सरकारने सर्व डाक कार्यालयामार्फत महिला सन्मान बचत पत्र ही नवीन बचत योजना एप्रिल महिन्यापासून सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून महिला ह्या आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याबरोबरच गुंतवणुकीत महिलांचा सहभाग वाढावा हा उद्देश असल्याचे डाक कार्यातून सांगण्यात आले.

🌅या योजनेतुन राज्यतील अधिका - अधिक महिलांना लाभ घ्यावा म्हणून डाक कार्यालयाच्या वतीने 10 ते 30 जून या कालावधीत विशेष मोहीम व जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. या योजनेच्या या योजनेचे अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन डाकघर अधीक्षक महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.

💁‍♂️दोन वर्ष सुरू राहणार ही योजना:-
महिला सन्मान बचत पत्र योजना ही महिला आणि मुलींच्या आर्थिक प्रगतीसाठी आहे.एका मुलीच्या नावावर अथवा मुलीच्या वतीने तिच्या नावावर तिचे पालक बचत पत्र घेऊ शकतात. ही योजनेची मुदत दोन वर्ष आहे या बचत पत्रात किमान 1हजारापासून ते 2 लाखापर्यंत गुंतवणूक करता येते.

💰एका महिलेच्या / मुलीच्या नावावर कमाल 2 लाखापर्यंत कितीही बचत पत्र घेता येतील परंतु दोन खात्यात किमान  तीन महिन्याचे अंतर असले पाहिजे बचत पत्रात व्याजदर हा वार्षिक 7.5% राहणार आहे शिवाय हे व्याज चक्रवाढ पद्धतीने असेल एका वर्षानंतर 40% रक्कम काढता येऊ शकते.

💁महिला सम्मान बचत पत्र योजनेच अकाउंट उघडण्यासाठी खाली दिलेल्या डॉक्यूमेंट्स ची आवश्यकता असणार आहे 

1) खाते उघडण्याचा चा फार्म (Post Officeमधून मिळेल )

2)रंगीत पासपोर्ट साइज फोटो

3)आधार कार्ड

4)पैन कार्ड

💁‍♂️महिला सन्मान बचत पत्रा मुळे किती पैसा मिळणार?

👉महिला सन्मान बचत पत्र योजने मध्ये  जमा पैसा वर सरकार 7.50% वर्ष्याला व्याज देणार. व्याज ही प्रत्येक तीन महिन्याला चक्रवाढ व्याज पद्धतीने मिळणार. 

👉आपन जेवढे जास्त पैसा जमा करणार , तेवढे अधिक पैसा आपल्यला 2 वर्ष्याच्या नंतर आपल्याला वापस मिळणार. किती पैसे जमा केल्यावर किती पैसे वापस मिळणार. हे खाली आपण पाहू शकता.

»1000/-रु जमा केल्यावर, 2 वर्षानंतर , 1160/- रु वापस मिळणार 

»2000/-रु जमा केल्यावर 2 वर्ष्यानंतर , 2320/- रु वापस मिळणार.

»3000/-रु जमा केल्यावर 2 वर्ष्यानंतर , 3481/- रु वापस मिळणार 

»5000/-रु रुपए जमा केल्यावर 2 वर्ष्यानंतर , 5801/-रु वापस मिळणार 

»10000/-रु  जमा केल्यावर 2 वर्ष्यानंतर , 11606/- रु वापस मिळणार.

»20000/- रु  जमा केल्यावर 2 वर्ष्यानंतर , 23204/- रु वापस मिळणार.

»50000/- रु  जमा केल्यावर 2 वर्ष्यानंतर , 58011/- रु वापस मिळणार 

»100000/-लाख जमा केल्यावर 1 लाख 16 हजार 22 रु वापस मिळणार 

»200000/- लाख जमा केल्यावर 2 लाख 32 हजार 44 रु वापस मिळणार.

💁‍♂️महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जनजागृती मोहीम:-

💁महिला बचत पत्र योजनेसाठी राज्यतील प्रत्येक जिल्ह्यात विशेष जनजागृती मोहीम 10 ते 30 जून या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे.जिल्ह्यातील प्रत्येक गावात जागृती मेळावे घेण्यात येणार आहेत यात योजनेची माहिती देण्यात येणार आहे. पोस्ट कार्यालयाच्या योजनेची माहिती दिली जाणार आहे.तसेच पात्र लाभार्थीचे तात्काळ नवीन खाते उघडण्यात येणार आहे.

ह्या पोस्ट इथे शेअर करा 👇👇👇👇👇👇

Sunday, 18 June 2023

"अँपवर फोटो टाका 72 तासात खड्डे मुक्त व्हा !*Public Work Department* Maharashtra Gov.t

अँपवर फोटो टाका 72 तासात खड्डे मुक्त व्हा!
*Public Work Department* Maharashtra Gov.त



💁‍♂️नमस्कार मित्रांनो सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन आपल्या सेवेसाठी पी सी आर सी हे अँप विकसित केलं आहे.

📲या अँप द्वारे आपल्या भागातील कुठलाही रस्त्यावर जर खड्डे पडले तर आपण आत्ता  थेट याची तक्रार आपण सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये करू शकणार आहेत.

👉आणि विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र हे सेवा देणार भारतातलं पाहिलं राज्य असेल.

➡️खड्डे मुक्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानेनवीन ॲप विकसित केले असून, या ॲपवर खड्ड्याचा फोटो टाकल्यास 72तासात खड्डे बुजवले जाणार आहेत.

🛤️मागील काही वर्षात रस्त्याचा विकास झाला आहे.अनेक रस्ते गुळगुळीत झाले आहेत. आणि प्रवास सुखकर झाला आहे. काही रस्त्यात खड्डे पडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रवास करणे जिकरीचे होते.

💁‍♂️सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांसाठी नवीन
ॲप विकसित केले आहे ज्या रस्त्यावर खड्डे दिसतील त्या खड्ड्याचा फोटो काढून ॲपवर अपलोड
करावयाचा आहे अवघ्या 72 तासांत सार्वजनिक बांधकाम विभाग हे खड्डे बुजविणार आहे बांधकाम
विभागाच्या या निर्णयामुळे  रस्ते खड्डे मुक्त होतील अशी
आशा निर्माण झाली आहे.

🤳ॲप तर विकसित केले मात्र त्याची अंमलबजावणी किती प्रमाणात होते आता येणारा काळच ठरविणार आहे एवढे मात्र निश्चित आहे.
         
            
                📲👇👇👇👇👇👇👇👇

💁‍♂️सार्वजनिक बांधकाम विभाग घेणार 72 तासांत दखल.:-
खड्ड्याचा फोटो ॲप वर अपलोड केल्यास 72 तासात त्याची दखल घेतली जाईल त्यामुळे आता रस्ते खड्डेमुक्त होण्याची आशा आहे

🤳अँप कसे डाउनलोड कराल google play store मध्ये जाऊन पीसीआरसी असे टाकावे ज्या ॲपच्या समोर पीसीआरसी पीडब्ल्यूडी असे लिहिले आहे ते ॲप डाऊनलोड करून घ्यावे


📲राज्य सरकार चे पीसीआरसी ॲप:-
पीसीआरसी हे ॲप राज्य शासनाने नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले आहे त्यामुळे नागरिकांना थेट
बांधकाम विभागाकडे तक्रार करण्याची संधी मिळणारा असून ॲपवर फोटो अपलोड केल्यानंतर तो खड्डा बुजविण्याची जबाबदारी आता बांधकाम विभागावर येऊन ठेपली आहे.

🛣️फोटो टाका खड्डे मुक्त व्हा!
 या अँप मुळे आता खड्ड्याचा फोटो काढा आणि खड्डे मुक्त होण्याची संधी नागरिकांना उपलब्ध झाली आहे जास्तीत जास्त नागरिकांना या ॲपचा वापर करावा



ह्या पोस्ट इथे शेअर करा 👇👇👇👇

Saturday, 17 June 2023

महिलांना व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी;महिलांना मिळणार व्यवसायासाठी 3- लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज! Udyogini Scheme-2023

महिलांना व्यवसायासाठी तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज! Udyogini Scheme -2023


💥उद्योगिनी योजना:- महिलांना होता येणार आर्थिक दृष्ट्या सक्षम

💁महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होता यावे यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात.
 त्यापैकी एक उद्योगिनी योजना.

💁‍♀️या योजनातुन महिलांना तीन लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.या योजनेची विशेष बाब म्हणजे अनुसूचित - जाती आणि अनुसूचित - जमाती आणि शारीरिक दृष्ट्या विकलांग महिलांना व्याजमुक्त कर्ज दिले जाते.

💁महिलांना स्वतःच्या पायावर उभा राहता यावे, त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी श्यासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात. त्यापैकी उद्योगिनी योजना ही एक महत्त्वकांक्षी योजना मानली जात आहे.

🤷ह्या माध्यमातून स्वतःचा लघुउद्योग सुरू करण्यासाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि शारीरिक दृष्ट्या विकलांग महिलांना तीन लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्व:स्वकर्तत्वावर खाजगी व्यवसाय उभारण्याची संधी मिळणार आहे.

📲काय आहे उद्योगिनी योजना!

👉उद्योगिनीयोजने अंतर्गत लाभार्थी महिलेला तीन
लाखापर्यंत कर्ज दिले जाते यासाठी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा जास्त नसावे या योजनेचे वैशिष्ट्ये म्हणजे लाभार्थी कर्जामध्ये 30%अनुदान देण्यात येते.

               
                     🔍 👇👇👇👇👇👇



💥कोणत्याकामासाठी कर्ज मिळते?

कोणत्याही उद्योगासाठी कर्ज मिळू शकते. त्यात दुकान, साडी, बेकरी,सौंदर्यप्रसाधन केंद्रे रास्त भाव दुकान, पिठाची गिरणी, स्टेशनरी स्टोअर. आदी व्यवसायाचा समावेश आहे


💥काय आहे योजनेचे महत्त्व?

 👉उदयोगिनी योजना लघु -व्यवसाय क्षेत्रातील व्यवसायिक किरकोळ विक्रेते उत्पादक स्वयरोजगार व्यवसायिक व्यापाऱ्यांसाठी अधिकाधिक तीन पर्यंत
कर्ज पुरवले जाते या कर्ज योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलां 18 ते 45 वर्षे या वयोगटातील असाव्यात.

👉उदयोगिनी योजनेअंतर्गत 18 ते 45 वयोगटातील महिला उद्योजक, शेती किरकोळ आणि अशा प्रकारच्या लघु उद्योगांमध्ये कर्जाची सोय केली गेलेली आहे

💁‍♀️या योजनेतर्गत महिलांना मिळते बिनव्याजी कर्ज
अनुसूचित -जाती अनुसूचित - जमाती तसेच शारीरिक दृष्ट्या विकलांग असलेल्या महिलांना बिनव्याजी कर्ज दिले जात आहे. इतर महिलांना मात्र यासाठी अत्यल्प व्याज द्यावे लागणार आहे

🏦या योजनेसाठी राष्ट्रीय,खाजगी बँकांमध्ये करा अर्ज?

🗒️या साठी अर्जदार सर्व आवश्यक कागदपत्रासह जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेला भेट देऊ शकतात.त्या ठिकाणी योजनेअंतर्गत अर्ज भरून द्यावा

👉या योजनेसाठी निकष काय?
योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी पासपोर्ट आकाराचे फोटो आधार कार्ड जन्म दाखला उत्पन्नाचा दाखला रेशन कार्ड जात प्रमाणपत्र बँक पासबुक झेरॉक्स आधी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक असतात


Tuesday, 13 June 2023

पीक -विमा संरक्षण मिळणार फक्त 1 रुपयांत, मंत्रिमंडळ निर्णय झाला! पीक -विमा 2023 1₹ Crop -Insurence

पीक -विमा संरक्षण मिळणार फक्त 1 रुपयांत, मंत्रिमंडळ निर्णय झाला!
पीक -विमा 2023 1₹ Crop -Insurence


1 रुपयात पीक विमा 
👳‍♀️शेतकरी मित्रांनो पंतप्रधान पिक विमा योजने संदर्भातील अतिशय महत्त्वपूर्ण आणि शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी अपडेट आली आहे. मित्रांनो खरीप हंगाम 2023 पासून पंतप्रधान पिक विमा योजनेत आता शेतकऱ्यांना आता एक रुपया भरून या ठिकाणी पिक विमा योजनेत सहभागी होता येणार आहे.

1 रुपयात पीक विमा 
💁‍♂️या संदर्भातील मंत्रिमंडळ निर्णय  मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाआहे . मागे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयास मंत्रिमंडळांने मान्यता दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती असल्यास की यावेळी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली होती. खरीप हंगाम 2023 पासून शेतकऱ्यांना केवळ एक रुपये शेतकरी हिस्सा भरून पिक विमा योजने सहभागी होता येणार आहे. तर याच आता मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे आणि लवकरच याबद्दल शासन निर्णय सुद्धा निर्मित करण्यात येणार आहे.

1 रुपयात पीक विमा 
💁‍♂️शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्यानंतर 2023 मध्ये जो की 1 जुलै 2023 पासून पिक विमा योजनेची सुरुवात होणार आहे तर त्यामध्ये शेतकरी बांधवांना 1 रुपये शेतकरी हिसा भरून या ठिकाणी पिक विमा योजने सहभागी होता येणार आहे. 


👉उर्वरित जो हिस्सा असेल तो हिस्सा राज्य सरकार
भरणार आहे. त्यामुळे आता शेतकरी बांधवांसाठी
अतिशय दिलासादायक आणि आनंदाची ही बातमी असणार आहे.

👳‍♀️शेतकरी मित्रांनो केवळ एक रुपयात पिक विमा योजनेचा लाभ लाखो शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्यात सर्व समावेश पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय मागे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पी भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून प्रधानमंत्री पिक विमा योजने लाभ देण्यात येईल.      

💁‍♂️या बैठकीचे अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई निश्चितीसाठी पिकांचे सरासरी नुकसान काढताना किमान 30 टक्के तंत्रज्ञान आधारित उत्पादन व पिक कापणी प्रयोगांतर्गत प्राप्त होणाऱ्या उत्पादनाचा मेळ घालून उत्पादन निश्चित करण्यात येईल.

🌾ही योजना सन,2023-24 ते 25,26 या तीन वर्षाच्या कालावधीसाठी निविदा प्रक्रियेने राबविण्यात येईल विमा हप्ता दरांच्या तुलनात्मक माहितीच्या आधारे नफा आणि तोटा शेअरिंग मॉडेल किंवा कप अँड कॅप मॉडेल म्हणजेच 80 च 110 नुसार मुख्य सचिवांचे अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय पिक विमा समन्वय समितीच्या मान्यतेने उचित पर्याय सह राबविण्यात येईल अभिनेत्यातील योजनेसाठी अंमलबजावणी यंत्रांची निवड झाल्यानंतर कार्यारंभ आदेश देतेवेळी मागील हंगामामधील राज्यहिस्सा विमा हप्ता रकमेच्या 50 टक्के रक्कम केंद्र व राज्य शासनाच्या एस्को अकाउंट मध्ये जमा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर अशा प्रकारे मंत्रिमंडळाच्या बैठकीत पिक विमा योजनेत आता शेतकऱ्यांना  एक रुपया भरून या ठिकाणी आपला सहभाग नोंदविता येणार आहे.

💁‍♂️महाराष्ट्र राज्य सरकारने अर्थसंकल्प 2023-24 या वर्षापासून शेतकऱ्यांना सर्व पिकांसाठी एक रुपयात Crop Insurance देण्याचे ठरवलेले आहे. या अगोदर काही ठराविक पिकांना Crop Insurance हा विम्याचे संरक्षण देण्यात येत होते. परंतु शेतकरी हिताचा हा नवीन निर्णय शासनाने अर्थसंकल्प सादर करताना जाहीर केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पीक कोणतेही शेतामध्ये पेरले तरी त्या पिकाला विम्याचे संरक्षण प्राप्त झाल्यामुळे शेतकरी होणाऱ्या नुकसानापासून चिंतामुक्त होणार आहे. एक रुपयात पिक विमा या महाराष्ट्र शासनाच्या नवीन धोरणानुसार महाराष्ट्रातील तब्बल सव्वा दोन कोटी अर्जदार शेतकऱ्यांना फायदा होणार आहे तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे तब्बल दोन हजार कोटी रुपये वाचणार आहेत.

💁‍♂️या अगोदर शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये 14 पिकांसाठी व रब्बी हंगामामध्ये सहा पिकांसाठी विमा संरक्षण घेता येत होते.

👉परंतु आता एक रुपयांमध्ये पिक विमा संरक्षण प्रीमियम खरेदी करता येत असल्यामुळे सर्वच पिकांचा विमा काढण्यास शेतकऱ्यांना सूट मिळालेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीत मोठ्या प्रमाणावर लाभ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशामध्ये तसेच राज्यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेची सुरुवात ही वर्ष 2016 पासून करण्यात आली होती, या योजनेअंतर्गत खरीप हंगामातील भात,ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग,उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळ, तीळ, सोयाबीन, कापूस व खरीप कांदा अशा 14 पिकांना तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, उन्हाळी भात, भुईमूग व रब्बी कांदा अशा सहा पिकांना पीक - विमा सुरू करण्यात आला होता.

👳‍♀️प्रधानमंत्री पीक - विमा संरक्षण प्रीमियम घेण्यासाठी शेतकऱ्यांना खरीप हंगामातील कापूस व कांदा या दोन पिकांसाठी पाच टक्के तर उर्वरित सर्व पिकांसाठी दोन टक्के प्रीमियम आकारण्यात येत होता. तसेच उर्वरित पिकांसाठी व रब्बी हंगामामध्ये दीड टक्के प्रीमियम आकारला जात होता. परंतु आता एक रुपयांमध्ये पीक - विमा संरक्षण प्रीमियम घेता येत असल्यामुळे सर्वच पिकांसाठी शेतकरी पिक विमा संरक्षण प्रीमियम घेऊ शकतात

👉आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या 2%रक्कम शेतकऱ्याकडून घेतली जात असे.ती रक्कम राज्यसरकार भरणार आहे.

👉आत्ता शेतकऱ्यांवर कोणताच भार असणार नाही.

👉यासाठी राज्य सरकारने 3312₹कोट्टी रुपयांची ची भरीव तरतूद केली आहे

👉विशेष म्हणजे 1जुलै पासून पीक - विमा भरायला सुरुवात होणार आहे

👉1जुलै ते 31जुलै ही पीक -विमा भरण्यासाठी ची अंतिम तारीख असेल 

Wednesday, 7 June 2023

🌾केंद्र सरकारकडून खरीप हंगाम 2023-24 साठीचे हमीभाव जाहीर !

🌾 केंद्र सरकारकडून खरीप हंगाम 2023-24 साठीचे हमीभाव जाहीर ! कोणत्या पिकाला किती भाव येथे पहा?


😇 काल ७ जूनला केंद्र सरकारकडून खरीप हंगाम २०२३-२०२४ साठी विविध पिकांचे हमीभाव जाहीर झाले - यावर्षी सर्व पिकांच्या हमीभावात ६ ते १० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

💁‍♂️ कसे आहेत नवीन हमीभाव

▪️तूर - ७००० ( प्रतिक्विंटल ) 

▪️कापूस -७०२० रु

▪️ज्वारी - ३१८० रु

▪️मक्का - २०९०

▪️सोयाबीनला - ४६००

▪️भुईमूग- ६३७७

▪️मूग - ८५५८ रु (सर्वाधिक १०.३५ % वाढ)

📌 ७ जूनला केंद्र सरकारकडून जाहीर झाले

MSP News :केंद्र सरकारने आज (ता. ७) येत्या खरीप हंगामासाठी म्हणजे २०२३-२४ साठी पिकांच्या किमान आधारभूत किंमती- (MSP) जाहीर केल्या. आधारभूत किंमती हमीभाव म्हणून ओळखल्या जातात.

२०२३-२४ या हंगामासाठी सोयाबीनची आधारभूत किंमत प्रति क्विंटल ४६०० रूपये असेल. गेल्या हंगामात ती ४३०० रूपये होती.

🤳एसएमएस प्राप्त शेतकऱ्यांचाच हरभरा हमीभावाने खरेदी होणार.

👉मध्यम धाग्याच्या कापसाची आधारभूत किंमत प्रति क्विंटल ६६२० रूपये असेल. ती गेल्या हंगामात ६०८० रूपये होती. तर लांब धाग्याच्या कापसाची आधारभूत किंमत ६३८० वरून ७०२० रूपये करण्यात आली आहे.

👉तुरीची आधारभूत किंमत प्रति क्विंटल ७००० रूपये असेल. ती गेल्या हंगामात ६६०० रूपये होती. मूग आणि उडदाच्या आधारभूत किंमती अनुक्रमे ८५५८ आणि ६९५० रूपये असतील. त्या गेल्या हंगामात अनुक्रमे ७७५५ आणि ६६०० रूपये होत्या.


👉पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने आधारभूत किंमतींना मान्यता दिली. केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाने आधारभूत किंमतींच्या शिफारशी केंद्र सकारला केल्या होत्या.

💁‍♂️अन्नधान उत्पादन वाढीसाठी 370कोटी चा निधी मंजूर

🌾राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी केंद्राने राज्याला गरजेनुसार आराखडा तयार करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीने यंदा या अभियानावर ३७० कोटी रुपये खर्च करण्यास मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे आराखड्यातील कामांना वेगाने सुरवातदेखील झाली आहे.

💁‍♂️केंद्राने या आराखड्याला मान्यता देण्याचे अधिकार राज्याला दिले. त्यामुळे आराखड्यातील योजनांवर वेगाने कामे सुरू झाली आहेत, असे सरकारचे म्हणणे आहे. भात, गहू, मका, कडधान्ये आणि पौष्टिक तृणधान्याच्या उत्पादन व उत्पादकता वाढीसाठी आराखड्यात भरपूर निधी राखीव ठेवला गेला आहे.

👉विशेष म्हणजे या आराखडा मध्ये गेल्या वर्षी च्या तुलनेत खूप मोठा बद्दल करण्यात आला आहे.

🌾अन्नधान्याच्या उत्पादन वाढीसाठी यंदा मूळ आराखडा २७४ कोटी रुपये खर्चाचा तयार करण्यात आला आहे. केंद्र व राज्य शासन मिळून २०२३-२४ या आर्थिक वर्षात हा आराखडा राबविण्याचा प्रयत्न करेल. यात केंद्राकडून १६४ कोटी रुपये तर राज्याकडून ११० कोटी रुपये दिले जातील.

💰राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानातील योजनांवर गेल्या हंगामात २२८ कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र, आर्थिक व प्रशासकीय अडचणींमुळे आराखड्यात बदल करावे लागले.

👉त्यामुळे वर्षाअखेरीस १२५ कोटी रुपये खर्च झाले. त्यात केंद्राचा हिस्सा ७९.२६ कोटींचा तर राज्याचा वाटा ५२.३९ कोटी रुपयांचा होता. यंदाच्या अभियानाचे वैशिष्ट्ये म्हणजे विविध योजनांमधील उपघटकांचे एकत्रीकरण करण्यास केंद्राने राज्याला मोकळीक दिली आहे.
शेतकऱ्यांना किफायतशीर मोबदला मिळावा आणि पिकांमध्ये वैविध्य यावे, यासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतींमध्ये भरीव वाढ करण्यात आली असल्याचा दावा केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयल यांनी केला आहे.


आमच्या व्हाट्सअँप ग्रुप 👇👇👇ला जॉईन व्हा 

ह्या पोस्ट ला येथे शेअर करा 👇👇👇👇

Sunday, 4 June 2023

राज्यात होणार 4 हजार 625 जागांची तलाठी भरती जाहिरात प्रकाशित ऑनलाईन अर्ज येथे करा?

राज्यात तलाठी पदासाठी 4 हजार 625 जागांची मेगाभरती!

   


💁‍♂️नमस्कार विद्यार्थी मित्रानो अखेर सरकारला तलाठी भरती चा मुहूर्त सापडला असून राज्यात लवकरच तलाठी भरती करण्यात येणार आहे.

👉Talathi Bharthi 2023 : तलाठी भरतीची तयारी करत असलेल्या उमेदवारासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कारण की राज्य सरकार द्वारे तलाठी भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे.(Talathi Bharti Online Apply)

👉राज्य सरकार द्वारे 4625 पदांची(Talathi Bharti Vacancies)भरती जाहिरात प्रकाशित केली गेली असून,लवकरच या भरतीला सुरुवात होणार आहे. तलाठी भरती परीक्षा दिनांक 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान ही परीक्षा घेतली जाणार आहे. ही भरती परीक्षा महाराष्ट्रातील संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये ऑनलाइन  पद्धतीने घेतली जाणार आहे.(Talathi Recruitment Maharashtra 2023)

😎तलाठी पदासाठी जाहिरात प्रकाशीत झाली असून बऱ्याच दिवसापासून उमेदवार तलाठी भरती पदाची आतुरतेने वाट पाहत होते. पण ही तलाठी भरती परीक्षा आता दिनांक 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर यादरम्यान घेण्यात येणार आहे.(Talathi Bharti Update 2023)

♦️तलाठी भरती अर्ज कोणत्याही एकाच जिल्ह्यात भरता येईल..

💁‍♂️ गेल्या अनके दिवसांपासून लाखो विद्यार्थ्यांचं लक्ष लागून असलेल्या तलाठी पदाची मेगाभरती सरकराने अखेर जाहीर केली आहे. राज्यात तब्बल 4 हजार 625  जागांची तलाठी पदासाठी मेगाभरती केली जाणार आहे. सरकारने याबाबत आदेश देखील काढले आहेत. 

📅 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान ही मेगाभरती होणार असल्याचे सरकारने काढलेल्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच राज्यातील 4 हजार 625 विद्यार्थ्यांचं भवितव्य उजळणार आहे. 

👉 या आदेश महसूल व वन विभागाकडून काढण्यात आला असून त्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण 4 हजार 625 पदांच्या सरळसेवा भरती करता राज्यातील एकूण 36 जिल्ह्यात ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान ही परीक्षा होणार असल्याचे आदेशात म्हटले आहेत.


एकूण पदे : 4625

 

■ शैक्षणिक पात्रता : पदवीधर, अधिक माहितीसाठी उमेदवारांनी भरती जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

 

■वयोमर्यादा :
1] खुला प्रवर्ग या उमेदवारासाठी 18 ते 38 वर्ष इतकी असेल.

2]तर मागास प्रवर्गातील उमेदवारांच्यासाठी 18 ते 43 वर्ष.

 

■अर्ज करण्याची पद्धत :ऑनलाइन

 

■ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात दिनांक व अंतिम दिनांक लवकरच अपडेट देण्यात येईल

 

■नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

 

■अधिकृत संकेतस्थळ :-  mahabhumi.gov.in

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण 4,625 पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडून दि. 17 ऑगस्ट 2023 ते दि. 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत महाराष्ट्रतील एकुण 36 जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (Computer Based Test) परिक्षा घेण्यात येणार आहे.

वेतनश्रेणी :-
S-8 : 25,500 – 81,100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.

एकूण पदे :- 4,625

परिक्षा वार व दिनांक :-
(दि. 17 ऑगस्ट 2023 ते दि. 12 सप्टेंबर 2023) संभाव्य तारीख सुस्पष्ट नंतर जाहिर केली जाणार आहे.

परीक्षा केंद्र :-
36 जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (Computer Based Test) परिक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा TCS द्वारे घेतली जाईल.

अर्ज करण्याची पद्धती :-
ऑनलाइन (प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे ऑनलाइन मागविण्यात येत आहेत.)

जाहिरातीची माहिती:-
https://mahabhumi.gov.in/mahabhumalink या लिंकवर उपलब्ध आहे. तसेच सदर जाहिरात सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहे.


🗒️तलाठी भरती साठी खालील कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे

👉शैक्षणिक कागदपत्रे :-➡️

1️⃣शाळा सोडल्याचा दाखला (10वी, 12वी, पदवी )

2️⃣10वी ची मार्कशीट

3️⃣12वी ची मार्कशीट

4️⃣पदवी प्रमाणपत्र

5️⃣पोस्ट ग्रेड्युअशन(केले असलास )

👉इतर कागदपत्र उपलब्ध असतील तर :-

1)माजी सैनिक प्रमाणपत्र

2)अपंग प्रमाणपत्र

3)खेळाडू प्रमाणपत्र

4)प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र

5)प्रमाणपत्र NSS, NCC.ETC

👉💥इतर आवश्यक कागदपत्र :-

1)राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (Nationality )

2)आदिवास प्रमाणपत्र (domacile )

3)नॉन क्रमिलेअर(Non-cremilayer )

4)जात वैधता प्रमाणपत्र(Validity )

5)जातीचा दाखला(caste certificate )

6)EWS प्रमाणपत्र (असेल तर )

7)महिला आरक्षण प्रमाणपत्र(फक्त महिलासाठीअसेल )

📝वरील कागदपत्राची पूर्तता करून ठेवावी


आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन व्हा 👇


ह्या पोस्ट इथे शेअर करा 👇👇👇

Monday, 29 May 2023

Aadhar Card Bank Linking Status | तुमचे आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे? असे चेक करा?

Aadhar Card Bank Linking Status | तुमचे आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे? असे चेक करा


Aadhar Card Bank Linking Status
नमस्कार मित्रांनो जसे कि आपल्याला माहीतच आहे बँकिंगचे कोणतेही व्यवहार आपल्याला ऑनलाईन करायचे असतील. तर आपला आधार कार्ड बँकेच्या अकाउंटशी लिंक करणे सर्वात महत्त्वाचं असतं.

🏦जर आपले आधार कार्ड बँकेच्या अकाउंट शी लिंक नसेल तर आपण आपले जे काही बँकेचे व्यवहार असतात ते ऑनलाईन करू शकत नाही. तर मग आपल्या आधार कार्ड आपल्या बँकेच्या अकाउंट ची लिंक आहे की नाही हे कसं बघायचं हे आपण आज  इथे मध्ये पाहणार आहोत ते पण आपल्या मोबाईल वर.

🤳मित्रांनो सर्वप्रथम आपला मोबाईल नंबर हा आपल्या आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे तरच आपण है चेक करू शकता. जर तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्ड शी लिंक नसेल तर तुम्हाला है चेक करता येणार नाही.

📱सर्वप्रथम तुम्हाला मोबाईल मध्ये आधार कार्डच्या अधिकृत संकेतस्थळावरील Resident Portal यायचं आहे. त्याची लिंक इथे दिलें आहे 👇🏻


                                                             👇👇👇👇
                                                            इथे क्लिक करा


Aadhar Card Bank Linking Status 
📲तुमच्या मोबाईल मध्ये ओपन झाला नंतर खालील check aadhar/bank seeding status या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.



check aadhar/bank seeding status
📟या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. व खालील दिलेला Captcha Code टाकाचा आहे. खालील सेंड OTP या पर्यायावरती क्लिक करायचं.



📠आता तिथे जो मोबाईल नंबर आधार कार्ड शी लिंक असेल त्यावर आलेला OTP टाकून घ्यायचा आहे. OTP टाकला नंतर खालील SUBMIT या बटनावर क्लिक करावे.



🔍SUBMIT केल्यानंतर आता तुमच्या आधार कार्ड वरील बँक लिंकिंग स्टेटस दिसतील.

Aadhar Card Bank Linking Status

👉तिथे तुम्ही कोणता तारखेला आधार बँकेला लिंक केलेले खाली त्या बँक चे नाव ही सर्व माहिती तिथे तुम्हाला दिसेल.

आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन व्हा
👇👇👇👇👇👇👇

ह्या पोस्ट ला 👇👇👇इथे शेअर करा 

Saturday, 20 May 2023

नोटबंदीची घोषणा ! 2000 हजारांच्या नोटा चलनातून मागे घेणार, RBI चा निर्णय.....अशा बदलून मिळणार नोटा जाणून घ्या काय आहे प्रक्रिया....

नोटबंदीची घोषणा ! 2000 हजारांच्या नोटा चलनातून मागे घेणार, RBI चा निर्णय.....अशा बदलून मिळणार नोटा जाणून घ्या काय आहे प्रक्रिया....
 

                👇👇👇👇👇👇👇                        

💰दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला असून या नोटांची छपाई बंद केली जाणार असल्याची रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी देण्यात आली. दरम्यान दोन हजाराच्या नोटा बँकांत जमा करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

👉केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातली होती. त्यावेळी अभूतपूर्व चलन तुटवडा निर्माण झाला होता. हा तुटवडा भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता याही नोटा चलनातून काढून घेतल्या जाणार आहेत. नोव्हेंबर 2016 मध्ये आरबीआय कायद्याच्या कलम 24(1) अंतर्गत दोन हजाराच्या नोटा बाजारात आणल्या गेल्या होत्या.

👉बाजारातील चलनाचा तुटवडा कमी झाल्यानंतर वर्ष 2018-19 मध्ये 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली होती. सध्या बाजारात असलेल्या दोन हजाराच्या 89 टक्के नोटांची छपाई मार्च 2017 पूर्वी झालेली आहे. या नोटांचे मार्च 2018 मध्ये असलेले 6.73 लाख कोटी रुपयांचे बाजारमूल्य 31 मार्च 2023 रोजी 3.62 लाख कोटी रुपयांपर्यंत कमी झालेले आहे. एकूण चलनात असलेल्या नोटांच्या तुलनेत दोन हजारांच्या नोटांची टक्केवारी केवळ 10.8 टक्के इतकी असल्याचे आरबीआयकडून सांगण्यात आले आहे.

 1) एकावेळी 20 हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून दिल्या जाणार.....             

बाजारात अन्य किमतीच्या नोटांचे पुरेसे प्रमाण आहे तसेच दोन हजार रुपयांच्या नोटांचा दैनंदिन जीवनात फारसा वापर केला जात नाही, यामुळे दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेतल्या जात असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. ठराविक मुदतीपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटांचा वापर जनतेला करता येणार आहे. लोकांनी बँकांत दोन हजार रुपयांची नोट जमा केल्यानंतर त्यांना तितक्याच किमतीच्या इतर चलनी नोटा दिल्या जातील. 23 मे पासून 30 सप्टेंबर पर्यंत जनतेला नोटा बदलून घेता येतील. एकावेळी 20 हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून दिल्या जाणार आहेत.

 2) 30 सप्टेंबर 2023 ही दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्याची शेवटची तारीख....                        

👉केंद्रात पहिल्यांदा मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर या सरकारने दोनच वर्षांनी म्हणजे 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी केली होती. त्यावेळी पाचशे व एक हजार रुपयांच्या जुन्या चलनी नोटा बाद करण्यात आल्या होत्या. यानंतर आता साडेसहा वर्षांनी दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्यात आल्या आहेत. दरम्यान एटीएम व अन्य माध्यमातून लोकांना दोन हजार रुपयांच्या नोटा देणे बंद करावे, असे निर्देश रिझर्व्ह बॅंकेने सर्व बँकांना दिले आहेत. 30 सप्टेंबर 2023 ही दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर पुढे काय होणार, हे अद्यापपर्यंत आरबीआयने सांगितलेले नाही.                                    

 3) नोटा बदण्यासाठी काय करावे :-                    

👉तुमच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा असतील तर टेन्शन घेण्याची गरज नाही. ही नोट अजूनही वैध आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर तुम्हाला बँक किंवा एटीएममधून 2000 रुपयांच्या नव्या नोटा काढता येणार नाहीत. यासोबतच तुम्हाला बँकेत तुमच्या जवळ असणा-या 2000 रुपयांच्या जुन्या नोटाही बदलून घ्याव्या लागतील. यासाठी रिझर्व्ह बँकेने 30 सप्टेंबरची मुदत दिली आहे. यानंतर काय होणार याबाबत आरबीआयने अद्याप काहीही सांगितलेले नाही.                                                                        

 4)नोव्हेंबर 2016 च्या नोटबंदीनंतर 2000 नोट व्यवहारात आली :-           

👉8 नोव्हेंबर 2016 रोजी केंद्र सरकारने नोटबंदीची घोषणा केली होती. यानंतर 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घालण्यात आली. त्या बदल्यात, केंद्रीय रिझर्व्ह बँकेने 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या. मात्र, काही वर्षांतच 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद करून त्याचे व्यवहारातील चलन कमी करण्यात झाले. बहुतांश एटीएममधून या नोटा गायब झाल्या. आता रिझर्व्ह बँकेने या नोटा मागे घेण्याची घोषणा केली आहे.

👉रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, 2018-19 या आर्थिक वर्षात 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. 2000 मूल्याच्या सुमारे 89 टक्के नोटा मार्च 2017 पूर्वी जारी करण्यात आल्या होत्या.

💵💸शिर्डीतील साई संस्थानचं भाविकांना आवाहन:- दोन हजार रुपयांच्या नोटा दानपेटीत टाकू नका; आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेतल्याचा परिणाम...

🧐बँकेने 2000 च्या नोटा परत न घेतल्यास येथे करा तक्रार
🖊️ रिझर्व बँक ऑफ इंडियाने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढण्याचा निर्णय घेतला आहे तसेच आरबीआयने बँकांना दोन हजार रुपयांच्या नोटा देणे तात्काळ बंद करण्याचा सल्ला दिला आहे 

⏲️ रिझर्व बँकेने 'क्लीन नोट पॉलिसी' अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेतून बदलून घेता येणार आहे मात्र बँकेने नोटा परत घेतल्या नाहीतर तुम्ही संबंधित बँकेच्या तक्रार विभागात तक्रार करू शकता

👉 पहा कुठे करता येईल तक्रार

💥जर तक्रार दाखल करून 30 दिवसांमध्ये बँकेने उत्तर किंवा तोडगा काढला नाही तर तुम्ही रिझर्व बँकेच्या rbi.org.in/Scripts/Complaints.aspx या पोर्टलवर तक्रार करू शकता.

💥ज्या नागरिकांच बँकेत खाते नाही अशा व्यक्तींकरता नोटा बदलून घेण्यासाठी वीस हजार रुपयांची मर्यादा असणार आहे याशिवाय कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही बँकेतून नोटा बदलून मिळू शकतात.

👉नोटबंदीची घोषणा!2000 हजारांचा नोटा चलनातून मागे घेणार, RBI

Tuesday, 16 May 2023

नोकरी: आरोग्य संचालनालय अंतर्गत 6000+ पदांची भरती जाहिरात प्रकाशित- अर्ज सुरु.!

नोकरी: आरोग्य संचालनालय अंतर्गत 6000+ पदांची भरती जाहिरात प्रकाशित- अर्ज सुरु.!
👨🏻‍💼 *पदाचे नाव
 प्रयोगशाळा सहाय्यक,
 प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
 ग्रंथपाल,
स्वच्छता निरिक्षक,
ई.सी.जी. तंत्रज्ञ,
आहारतज्ञ,
औषधनिर्माता,
डॉक्युमेंटालिस्ट / कॅटलॉगर/प्रलेखाकार/ग्रंथसूचीकार, समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय),
ग्रंथालय सहाय्यक, व्यवसायोपचारतज्ञ/ ऑक्युपेशनथेरेपीस्ट / व्यवसायोपचार तंत्रज्ञ,
दुरध्वनीचालक,
 महिला अधिक्षीका / वॉर्डन वसतीगृह प्रमुख/ वसतीगृह अधिक्षीका,
अंधारखोली सहाय्यक,
क्ष-किरण सहाय्यक, सांखिकी सहाय्यक,
दंत आरोग्यक/ दंतस्वास्थ आरोग्यक,
भौतिकोपचारतज्ञ,
दंत तंत्रज्ञ,
सहाय्यक ग्रंथपाल,
श्रवणमापकतंत्रज्ञ / ऑडियोव्हिजनल तंत्रज्ञ / ऑडीयोमेट्रीक तंत्रज्ञ,
विद्युत जनित्र चालक / जनरेटर ऑपरेटर,
नेत्रचिकित्सा सहाय्यक,
डायलेसिस तंत्रज्ञ,
शारिरिक शिक्षण निर्देशक / शारिरिक प्रशिक्षण निर्देशक,
शिंपी,
सहाय्यक दंत तंत्रज्ञ,
मोल्डरूम तंत्रज्ञ,
लोहार / सांधाता,
वाहनचालक,
गृह नि वनपाल / गृहपाल/ लिनन किपर,
क्ष किरण तंत्रज्ञ,
सुतार,
कातारी- नि जोडारी, जोडारी मिश्री / बॅचफिटर,
अधिपरिचारीका,
उच्चश्रेणी लघुलेखक,
निम्नश्रेणी लघुलेखक,
लघुटंकलेखक,
अधिपरिचारिका.

👥 पद सख्या –६०००+ जागा (स्टाफ नर्स : ३०००+) – अधिपरिचारिकांची ३,९७४ पदे भरली जाणार असून त्यातील १९५४ पदे खुल्या संवर्गासाठी आहेत. अनुसूचित जमातीसाठी ३२१ आणि अनुसूचित जातीसाठी ३३८ पदे तर उर्वरित पदे इतर संवर्गासाठी आहेत.
                              आमच्या Whatsapp Group ला जॉईन व्हा!


📚 शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

📍 नोकरी ठिकाण :-महाराष्ट्रातील विविध जिल्हे

🖨️ अर्ज पद्धती – ऑनलाईन

👤 वयोमर्यादा –  १८ ते ३८ (राखीव व इतर माहितीसाठी PDF बघावी)

📩 अर्ज पाठवण्याचा पत्ता –संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई

📆 *अर्ज सुरु झाल्याची तारीख* – १० मे २०२३

📅 *अर्ज करण्याची शेवटची तारीख –* २५ मे २०२३

💸परीक्षा शुल्क
💰अराखीव – १०००/- + बँक चार्जेस

💰मागास वर्गीय/ आर्थिक दुर्बल/ अनाथ – ९००/- + बँक चार्जेस

🌐 *अधिकृत वेबसाईट-www.med-edu.in

☎️ *मदतकेंद्र –* Helpline No (Technical) – +91-9513252088

🖨️ *ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक* 
*📣 आरोग्य संचालनालय अंतर्गत भरती*

▪️ 

Monday, 8 May 2023

फेरफार उतारा ऑनलाईन कसा डाऊनलोड करायचा?

 फेरफार उतारा ऑनलाईन कसा डाऊनलोड करायचा?



गावपातळीवर फेरफार म्हणजेच गाव नमुना-6 अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. एखाद्या व्यक्तीच्या जमीन अधिकार अभिलेखात जे बदल होतात, त्याची नोंद फेरफारात ठेवली जाते.

फेरफार नमुन्यात जमिनीची खरेदी-विक्री, वारस नोंदी, शेतजमिनीवर बोजा लावणं अशा बदलांची सविस्तर माहिती दिलेली असते.


पण तुम्हाला माहित आहे का, तुम्ही घरबसल्या मोबाईलवर डिजिटल स्वाक्षरीतला फेरफार उतारा डाऊनलोड करू शकता. तशी सुविधा महसूल विभागानं 1 ऑगस्ट 2021 पासून उपलब्ध करून दिली आहे.


हा फेरफार उतारा डाऊनलोड कसा करायचा, याची माहिती आपण आता जाणून घेऊया.


फेरफार उतारा कसा काढायचा?

1) फेरफार उतारा काढण्यासाठी तुम्हाला digitalsatbara.mahabhumi.gov.in या वेबसाईट वर जायचं आहे.

2)यानंतर महसूल विभागाचं आपला 7/12 नावाचं एक  नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.

3)तुम्ही जर आधीच या वेबसाईटवर नोंदणी केली असेल, इथं येऊन सातबारा, आठ-अ काढला असेल,तर लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साईटवरील सेवांचा लाभ घेऊ शकता.

4)पण, जर तुम्ही पहिल्यांदाच इथं आला असेल, तर  मोबाईल क्रमांक वापरूनही तुम्हाला इथल्या सेवांचा लाभ घेता येतो.

4)त्यासाठी OTP Based Login या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

5)त्यानंतर Enter Mobile Number च्या खालच्या  रकान्यात तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मग Send OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

5)तुम्ही या पर्यायावर क्लिक केलं की, OTP sent on your mobile असा मेसेज तिथं येईल.

7)याचा अर्थ तुमच्या मोबाईलवर एक OTP म्हणजेच One Time Password म्हणजेच काही आकडे  पाठवलेले असतात, ते जसेच्या तसे तुम्हाला Enter    OTP च्या खालच्या रकान्यात टाकायचे आहेत.

8)त्यानंतर Verify OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

9)पुढे तुमच्यासमोर आपला सातबारा नावानं एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर Digitally signed 7/12, Digitally signed 8A, Digitally signed eFerfar, Digitally signed Property card, Recharge Account, Payment History, Payment Status असे वेगवेगळे पर्याय दिसतील.

10)यातल्या Digitally signed eFerfar या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

11)त्यानंतर डिजिटल स्वाक्षरीत फेरफार असं शीर्षक असलेलं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. 

12)यामध्ये सगळ्यात शेवटी सूचना दिलेली आहे की, Rs.15 will be charged for download of every eferfar. This amount will be deducted from available balance.

13)याचा अर्थ फेरफार उताऱ्यासाठी 15 रुपये चार्ज केले जातील, ते तुमच्या उपलब्ध बॅलन्समधून कापले जातील.

14)आता आपण नवीन रेजिस्ट्रेशन केलेलं असल्यामुळे आपल्या खात्यात इथं काही बॅलन्स नसतं. त्यामुळे सगळ्यात आधी खात्यात पैसे जमा करणं गरजेचं असतं.

15)ते कसे करायचे तर खाली असलेल्या रिचार्ज अकाऊंट या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

16)तिथं एंटर अमाऊंट समोर 15 रुपये एवढा आकडा टाकायचा आहे आणि मग पे नाऊवर क्लिक करायचं आहे.

17)त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी तिथं असलेल्या छोटा डब्ब्यात टिक करायचं आहे आणि मग कन्फम बटन दाबायचं आहे.

18)त्यानंतर हे पैसे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा भीम ॲप असेल तर त्याद्वारे जमा करता येऊ शकतात. तसे वेगवेगळे पर्याय इथे दिलेले आहेत.

19)पेमेंटसाठीची ही माहिती भरली की तुमच्या मोबाईलववर एक ओपीटी पाठवला जातो. तो टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे.

20)त्यानंतर स्क्रीनवर your payment was successful याचा अर्थ तुम्ही 15 रुपये जमा केले आहेत, असा मेसेज येतो. इथं असलेल्या continue या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

21)त्यानंतर डिजिटल स्वाक्षरीतल्या सातबारा उताऱ्याचं पेजवर तिथं ओपन होईल. 

22)पण आपल्याला फेरफार काढायचा असल्याने Digitally signed eFerfar यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

23)त्यानंतर तुम्हाला जिल्हा, तालुका, गाव, फेऱफार नंबर टाकायचा आहे. 

24)तुमच्या सातबारा उताऱ्यावरील हा फेरफार क्रमांक नमूद केलेला असतो.

25)शेवटी डाऊनलोड पर्यायावर क्लिक करायचं आहे.

26)त्यानंतर RS.15 will be deducted from your available balance for Ferfar download, असा मेसेज स्क्रीनवर दिसेल. त्याखालच्या ओके या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर डिजिटल स्वाक्षरीतला फेरफार तिथं डाऊनलोड होईल.

27)यात सुरुवातीला फेरफाराचा क्रमांक, त्यानंतर अधिकाराच्या स्वरुपात काय बदल झाला, याची सविस्तर माहिती दिलेली असते. पुढे परिणाम झालेले गट क्रमांक आणि अधिकाऱ्याचं नाव आणि शेरा दिलेला असतो.

28)या उताऱ्यावर शेवटी स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की, हा अभिलेख फेरफाराच्या डिजिटल स्वाक्षरीत 21-07-2021 रोजी डेटा वरून तयार झाल्यामुळे यावर कोणाच्याही सही-शिक्क्याची आवश्यकता नाही.

 आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा 



3)    प्रकारच्या सुविधा

आपली चावडी उपक्रमाअंतर्गत नागरिकांना घरबसल्या डिजिटल सुविधा मिळणार आहेत.

सध्या तीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

👉यात नोटीस पहा या रकान्यात नागरिक फेरफाराची नोटीस पाहू शकतात. ही माहिती आपण नुकतीच पाहिली आहे.

👉त्यानंतर फेरफाराची स्थितीमध्ये फेरफाराच्या नोटीशीवर कुणी हरकत घेतली आहे का, हरकतीचा शेरा आणि तिचा तपशील दिलेला असतो. हरकतीसाठी 15 दिवसांचा अवधी दिला जातो. या कालावधीत कुणी

हरकत घेतली नसेल तर फेरफारावरील नोंद प्रमाणित केली जाते आणि मग ती सातबाऱ्यावर नोंदवली जाते.

👉त्यानंतर तिसरा पर्याय आहे मोजणीची नोटीस. यात तुमच्या गावात जमीन मोजणी कुणी आणली आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते.

💥यात मोजणीचा प्रकार, मोजणीचा रेजिस्ट्रेशन क्रमांक, तालुका आणि गावाचं नाव, ज्या गट क्रमांकावर मोजणी करायची आहे तो गट क्रमांक, मोजणीचा दिनांक आणि मोजणीस येणाऱ्या कर्मचाऱ्याचं नाव आणि मोबाईल क्रमांक दिलेला असतो.

💥यानंतर शेतजमिनीचे लगतचे खातेदार आणि सहधारक यांची माहिती नमूद केलेली असते.

Friday, 5 May 2023

कंपोस्टखत तयार करण्याच्या पद्धत जाणून घ्या काय आहेत फायदे?

कंपोस्टखत तयार करण्याच्या पद्धत जाणून घ्या काय आहेत फायदे?

*शेतामध्ये उपलब्ध असलेला टाकाऊ स्वरूपाचा काडीकचरा, गोठ्यातील जनावरांचे मलमूत्र, पिकाचे उरलेले अवशेष, तसेच बांधावरील झाडाची पानगळ इत्यादी अवशेषांचे जिवाणूंच्या सहयोगाने कुजवून तयार केलेले खत म्हणजे कंपोस्ट खत होय.

💥कंपोस्ट खत पद्धती💥

💥इंदौर पद्धत  :-

🌲इंदौर पद्धतीलाच ढीग पद्धत म्हणतात. या पद्धतीमध्ये सर्वसाधारणपणे 6 फूट रुंद व 5 ते 6 फूट उंच आणि सेंद्रिय पदार्थांच्या उपलब्धतेनुसार लांबी ठेवून शेतातील उरलेले पिकांचे अवशेष, काडीकचरा, शेण, तण इत्यादी सेंद्रिय पदार्थांचा त्यावर एक थर ठेवला जातो.

🌲 ढीग पद्धतीमध्ये कुजण्याची प्रक्रिया उघड्यावर (ऑक्‍सिजनयुक्त) लवकर होण्याकरिता एका महिन्याच्या अंतराने ढीग वर-खाली करून कुजणारे पदार्थ एकजीव केले जातात.

🌲तसेच ओलावा टिकविण्याकरिता पाणी शिंपडले जाते. याशिवाय ढिगावर प्लॅस्टिकचे आच्छादन टाकल्यास तापमानात वाढ होऊन

🌲कुजण्याची क्रिया जलद होण्यास मदत होते. 3 ते 4 महिन्यांत चांगले कंपोस्ट खत तयार होते.

🌲या खतामध्ये 0.8 ते 1.5 टक्के नत्र, 0.5 ते 1 टक्का स्फुरद व 1 ते 1.8 टक्के पालाश मिळून इतर अन्नघटक असतात.


💥बंगलोर पद्धत:-

🌲बंगलोर पद्धतीलाच खड्डा पद्धत म्हणतात. या पद्धतीमध्ये सर्वांत खालचा थर 15 ते 20 सें. मी. जाडीचा काडीकचरा व इतर सेंद्रिय पदार्थांचा थर देऊन पाणी शिंपडून ओला केला जातो.

🌲अशा प्रकारे खड्डा भरून जमिनीच्या सुमारे दीड ते दोन फूट उंचीपर्यंत शेणमाती मिश्रण करून लिंपून घेतले जाते.

🌲सेंद्रिय पदार्थांची कुजवण्याची क्रिया लवकर होण्याकरिता अधूनमधून पाणी शिंपडले जाते.

🌲 कुजण्याची क्रिया सुरवातीला ऑक्‍सिजनविरहित वातावरणात होत असल्याने कुजण्याचा वेग मंदावतो. त्यामुळे खत तयार होण्यास वेळ लागतो.

🌲या पद्धतीमध्ये अन्नद्रव्ये वाया जाण्याचे प्रमाण कमी असते.


💥नॅपेड पद्धत:-

🌲या पद्धतीत जमिनीवर पक्‍क्‍या विटांच्या साह्याने 10 फूट लांब, 6 फूट रुंद व 3 फूट उंच अशा आकाराचे टाकीचे बांधकाम केले जाते. विटांच्या दोन ओळींनंतर तिसऱ्या ओळीत खिडक्‍या ठेवल्या जातात.

🌲या पद्धतीमध्ये सुमारे एक ते दीड टन काडीकचरा, 100 कि. ग्रॅ. शेण, दीड टन चाळलेली माती भरली जाते.

🌲नॅपेड पद्धतीमध्ये सर्वांत खालचा थर चांगला ठोकून शेणाचा सडा टाकून घेतात.

🌲त्यानंतर 6 इंच जाडीचा काडीकचरा थर व इतर सेंद्रिय पदार्थांचा थर देऊन त्यावर 100 लिटर पाण्यात 4 ते 5 कि. ग्रॅ. शेण मिसळून शिंपडले जाते.

🌲यानंतर साधारणतः 1 ते 2 इंच जाडीचा चाळलेला मातीचा थर अर्धा देऊन परत पाणी शिंपडून ओलावा केला जातो. अशा प्रकारे 3 ते 4 महिन्यांत उत्कृष्ट कंपोस्ट तयार होते.


💥कंपोस्ट खताचे फायदे:-

👆कंपोस्ट खत हा सर्वसामान्य शेतकरी स्वतःच्या शेतावर तयार करू शकतो.

👆कंपोस्ट खतनिर्मिती ही खर्चिक नसून, आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडण्यासारखी आहे. टाकाऊ सेंद्रिय पदार्थाचा पुनर्वापर होतो.

👆कंपोस्ट खतामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढल्याने धूप कमी होते.

👆कंपोस्ट खतामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते. त्यामुळे जमिनीची सुपिकता टिकवून सूक्ष्म जीवांची संख्या वाढते.

Wednesday, 26 April 2023

मोठा निर्णय! रेती, वाळू धोरणाची अंमलबजावणी 'या' तारखेपासून होणार..

💥💥मोठा निर्णय! रेती, वाळू धोरणाची अंमलबजावणी 'या' तारखेपासून होणार..


💁🏻‍♂️ राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती, वाळू धोरण राज्य शासनामार्फत जाहीर करण्यात आले होते. महाराष्ट्र दिनी (1 मे) या धोरणाची अंमलबजावणी सुरु करण्यात येणार असून सर्वसामान्यांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून रेती/वाळू मिळणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

🗣️ मंत्री विखे पाटील म्हणाले की,  या नवीन धोरणानुसार प्रायोगिक तत्त्वावर एक वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास 600 रुपये वाळू विक्रीचा दर निश्चित करण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार असून घरांच्या किंमतीही आवाक्यात येण्यास मदत होणार आहे. वाळू लिलाव बंद होणार असल्याने डेपोतूनच 600 रुपयात वाळू उपलब्ध होणार आहे. या धोरणानुसार स्वामित्व धनाची रक्कम माफ करण्यात येईल. 

👨🏻‍💼 याशिवाय जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी व वाहतूक परवाना सेवा शुल्क इत्यादी खर्च देखील आकारण्यात येतील. वाळूचे उत्खनन, उत्खननानंतर वाळूची डेपो पर्यंत वाहतूक, डेपोची निर्मिती आणि व्यवस्थापन यासाठी एक निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल. यातून वाळू किंवा रेती उत्खनन करण्यात येईल. ही रेती शासनाच्या डेपोमध्ये नेली जाईल व तिथूनच या रेतीची विक्री करण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना महसूल मंत्री यांनी केल्या आहेत.

🧐 ​नदी पात्रातील वाळू गटाचे निरीक्षण करण्याची कार्यवाही तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती करेल. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरिय वाळू संनियंत्रण समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती वाळू गट निश्चित करून, त्या गटासाठी ऑनलाईन ई-निविदा पद्धती जाहीर करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीला शिफारस करेल. 

📍 जिल्हास्तरीय संनियत्रण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील आणि या समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक किंवा पोलिस आयुक्त, अपर जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभाग तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी, भू-विज्ञान व खनिकर्म विभाग, भूजल सर्वेक्षण तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असतील. ही समिती वाळू डेपोमध्ये वाळू साठा उपलब्ध करून घेण्यासाठी वाळू गट निश्चित करतील. तसेच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या निर्देशांचे पालन होईल, याची दक्षता घेण्यात येईल.


वाळू लिलाव आता बंद होणार?

Monday, 24 April 2023

पावसाबाबत भेंडवळची घट मांडणी चे भाकीत जाहीर?

👳‍♀️पावसाबाबत भेंडवळची घट मांडणी चे भाकीत        जाहीर?
💥👳‍♀️ राज्यातील शेतकऱ्याचे लक्ष लागून असलेल्या बुलढाणातील भेंडवळची घटमांडणी चे भाकीत जाहीर झाले आहे त्यानुसार  जून महिन्यात कमी पाऊस होईल  जुलै महिन्यात सर्वसाधारण  पाऊस होईल.ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस असून अतिवृष्टी देखील होईल तर सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी पडेल पण अवकाळी पाऊस भरपूर पडेल व पिकांचे नुकसान होईल अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे. 350 वर्षपासून भेंडवळची घटमांडणी सुरु आहे


🌧️ भेंडवळची भाकणूक (बुलढाणा)-   यंदा पाऊसमान साधारण राहील, पण पिकांचे उत्पादन चांगले होईल आणि दरही चांगला मिळेल.

तसेच पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात पुन्हा सत्ता जाईल, पण त्यांना संघर्ष करावा लागेल, अशी भाकणूक भेंडवळच्या घटमांडणीत रविवारी सकाळी करण्यात आली.

               

            आजचा हवामान अंदाज
            दिनांक :-24 एप्रिल 2023

🌧️ पुढील पाच दिवस राज्यात अवकाळीचा इशारा!            हवामान विभागाने वर्तवला अंदाज

💁‍♂️ गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे उन्हाचा तडाका तर कुठे अवकाळी पाऊस पडत आहे. त्यातच राज्यात उन्हाच्या झळा आणखी तीव्र होऊ लागल्यामुळे तापमानात घट कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र या बदलत्या वातावरणामुळे शेतकरी अडचणीत सापडत आहे. अशातच हवामान विभागाने या आठवड्यासाठी एक महत्वपूर्ण अंदाज वर्तवला आहे.

👨🏻‍🌾 अंदाजानुसार पुढील पाच दिवस राज्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच विदर्भात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाची तीव्रता अधिक राहून गारपीटीची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. तसेच या आठवड्यामध्ये विदर्भात नागपूरसह बऱ्याच राज्यांमध्ये वातावरणाची स्थिती कायम राहणार आहे.

👉 यामध्ये सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांना अवकाळीचा तडाखा बसण्याची दाट शक्यता आहे. या अवकाळी पावसाचा तडाखा बसल्यास पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील उभ्या पिकांची काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात येत आहे.

Friday, 21 April 2023

माजी सैनिकांना घेता येणार 'या' विद्यापीठाकडून ‘बीए’ ची पदवी?

📝 माजी सैनिकांना घेता येणार 'या'                   विद्यापीठाकडून ‘बीए’ ची पदवी?
💁🏻‍♂️👨‍✈️ माजी सैनिकांना विविध नोकऱ्यांसाठी कला शाखेतून बीए (मानव संसाधन व्यवस्थापन) (BA (HRM)) पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी केंद्रीय सैनिक बोर्ड व आंध्र विद्यापीठ यांच्यात करार करण्यात आला आहे. या कराराद्वारे माजी सैनिकास आंध्र विद्यापीठाद्वारे कला शाखेतून बीए (मानव संसाधन व्यवस्थापन) पदवी प्रमाणपत्र मिळवता येणार आहे.

💥👨‍✈️माजी सैनिकास निवृत्तीच्या वेळी प्राप्त झालेले शैक्षणिक प्रमाणपत्र काही संस्था मान्य करत नाहीत. अशा माजी सैनिकांना कला शाखेमधून बीए (मानव संसाधन व्यवस्थापन) पदवी प्रमाणपत्र प्राप्त करून देण्यासाठी हा करार झालेला आहे. हे पदवी प्रमाणपत्र केंद्र व राज्य शासन तसेच इतर सार्वजनिक उपक्रमाच्या नोकरीसाठी मान्यताप्राप्त आहे.

💥👨‍✈️माजी सैनिकांसाठी कला शाखेतून पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी  पात्रता व अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार अर्जदार माजी सैनिक असावा. अर्जदाराचे शिक्षण इयत्ता बारावी किंवा समतुल्य शिक्षण किंवा भारतीय आर्मी, नेव्ही, एअर फोर्सद्वारा प्राप्त शिक्षणाचे विशेष प्रमाणपत्र असावे. माजी सैनिकांची सेवा पंधरा वर्षापेक्षा कमी नसावी. दि. 1 जानेवारी 2010 नंतर निवृत्त झालेला असावा. 

👮 माजी सैनिक इयत्ता दहावी पास असेल तर अशा उमेदवारांना 5 वर्षांचा अभ्यासक्रम (2 वर्ष 12वी + 3 वर्ष पदवी) लागू राहील. या अभ्यासक्रमाचे शुल्क 12 हजार 500 रुपये असून अर्जदाराने आपले अर्ज फक्त एप्रिल किंवा ऑक्टोबर महिन्यातच संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावेत. अधिक माहितीसाठी www.ksb.gov.in या संकेतस्थळी भेट देऊन circulars / publications पहावे किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास भेट द्यावी,असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे...

Wednesday, 19 April 2023

नोकरी:- तब्बल 3055 जागांसाठी भरती सुरू...?

🛄 नोकरी:- तब्बल 3055 जागांसाठी भरती सुरू...
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत नर्सिंग ऑफिसर पदाच्या 3055 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. उमेदवारांना खालील सविस्तर जाहिरात वाचून, शैक्षणिक पात्रता तपासून ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

📋परीक्षेचे नाव:- नर्सिंग अधिकारी भरती सामान्य पात्रता परीक्षा (NORCET)

🎯पदाचे नाव व जागा:- नर्सिंग ऑफिसर (3055 जागा)

🔔शैक्षणिक पात्रता:- B.Sc (Hons.) नर्सिंग/ B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM डिप्लोमा+किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटलमधील 02 वर्षे अनुभव.


📝 ऑनलाईन अर्ज करा:-

📅  ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:-5 मे 2023

💰 फी : -जनरल/ओबीसी: 3000 रु./- [एससी/एसटी/ईडब्ल्यूएस: 2400 रु./-, पीडब्ल्यूडी: फी नाही]

👤वयोमर्यादा :- 05 मे 2023 रोजी 18 ते 30 वर्षे          [एससी/एसटी: 05 वर्षे सूट, ओबीसी:03 वर्षे सूट]

📍 नोकरी ठिकाण:- संपूर्ण भारत

Tuesday, 18 April 2023

केंद्र सरकारची मोठी घोषणा - आता जनधन खातेधारकांना मिळणार १० हजार रुपये?

👳‍♀️केंद्र सरकारची मोठी घोषणा - आता जनधन           खातेधारकांना मिळणार १० हजार रुपये?


👌 जनधन खातेधारकांना केंद्र सरकारकडून दहा हजार रुपये दिले जात आहेत. त्याचबरोबर सरकारने या खात्यावर विम्याची सुविधाही दिली आहे. या खात्यावर सरकारकडून ओव्हरड्राफ्ट सुविधाही दिली जाईल असे सरकारने सांगितले आहे. 

💁‍♂️ पहा आणखी काय सांगितले सरकारने

💰 या सुविधेअंतर्गत तुमच्या खात्यात एकही रुपया नसला तरी तुम्ही १० हजार रुपये काढू शकता, याआधी ही सुविधा फक्त ५ हजार रुपये होती मात्र आता सरकारने हीच मर्यादा वाढवून १० हजार रुपये केली आहे. 

🖊️ मात्र यासाठी सरकारने काही अटी ठेवल्या आहेत, जनधन खात्यावर कमीत कमी सहा महिन्यांसाठी समाधानकारक व्यवहार झालेले असावेत. त्याचबरोबर खातेधारकांचे दुसऱ्या कोणत्याही बँकेत बचत खाते नसावे असे केंद्र सरकारने म्हटले आहे. 

🙏 जनधन खातेधारकांना मिळणार १० हजार रु 
 हि माहिती सर्व नागरिकांसाठी खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा 


Monday, 17 April 2023

मुख्यमंत्री सहायता निधीत मोठा बदल - पहा कसे आहेत नवे बदल.मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कसा मिळवावा?

 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कसा मिळवावा?


मुख्यमंत्री सहाय्यता निधी टोल फ्री क्र. ८६५०५६७५६७
Email id:aao.cmrf-mh@gov.in

राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील शिंदे-फडणवीस सरकारने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष अंतर्गत अर्थसहाय्य करण्यात येणाऱ्या आजारांच्या यादीत अनेक नवीन आजारांचा समावेश केला आहे.

जास्तीतजास्त शेअर करा, गरजू रुग्णांपर्यंत पर्यंत पोहोचवा!

■ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
१. अर्ज ( विहीत नमुन्यात)
२. निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. (खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.)
३. तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला.
(रु. १.६० लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.) 
४. रुग्णाचे आधारकार्ड (महाराष्ट्र राज्याचे) लहान बाळासाठी (बाल रुग्णांसाठी) आईचे आधारकार्ड आवश्यक
५. रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)
६. संबंधीत आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे. 
७. अपघातग्रस्त रुग्णांसाठी चङउ रिपोर्ट आवश्यक आहे.
८. प्रत्यारोपण रुग्णांसाठी नढउउ / शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे.
९. रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.
          
                
● अर्थसहाय्याची मागणी ई मेल व्दारे केल्यास अर्जासह सर्व कागदपत्रे PDF स्वरुपात (वाचनीय) पाठवावी.

Email id:aao.cmrf-mh@gov.in

● व त्याच्या मुळ प्रती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कडे टपालाव्दारे तात्काळ पाठविण्यात यावेत.

■ *मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळणाऱ्या आजारांची नांवे.


१. कॉकलियर इम्प्लांट ( वय वर्ष २ ते ६),
२. हृदय प्रत्यारोपण
३. यकृत प्रत्यारोपण
४. किडणी प्रत्यारोपण
६. बोन मॅरो प्रत्यारोपण
५. फुफ्फुस प्रत्यारोपण
७. हाताचे प्रत्यारोपण
८. हिप रिप्लेसमेंट
९. कर्करोग शस्त्रक्रिया
१०. अपघात शस्त्रक्रिया
११. लहान बालकांचे शस्त्रक्रिया
१२. मेंदूचे आजार
१३. हृदयरोग
१४. डायलिसिस 
१५. अपघात
१६. कर्करोग (केमोथेरपी/ रेडिएशन)
१७. नवजात शिशुंचे आजार
१८. गुडघ्याचे प्रत्यारोपण 
१९. बर्न रुग्ण
२०. विद्युत अपघात रुग्ण

या अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी* उपरोक्त तीनही योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या आणि राज्यातील या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय समितीमार्फत तपासून अर्थसहाय्य दिले जाते.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी टोल फ्री क्र. : -८६५०५६७५६७
संपर्क क्र. ०२२-२२०२६९४८ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष अंगीकृत असलेल्या रुग्णालयांची सविस्तर माहिती व
रुग्णालयांची यादी वेबसाईटवर आहे.

आपले नम्र,:-
मंगेश नरसिंह चिवटे,
कक्ष प्रमुख,
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष, तथा विशेष कार्य अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय.

रोहित वायभासे वैदकीय सहाय्यक:- 8907776009/ 9067171514


वैद्यकीय मदतीसाठी खालील लिंक वर क्लिक करून रुग्णाचा तपशील पाठवा

 मुख्यमंत्री सहायता निधीत मोठा बदल - पहा कसे आहेत नवे बदल

🧐 तुम्हाला माहिती असेल, रुग्णांची गरज ओळखून राज्य सरकारने मुख्यमंत्री सहायता निधी पुन्हा सुरू केला आहे. या योजनेमध्ये आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या लोकांना दुर्धर आजारांवर उपचार घेणे शक्य होत नाही. 

💰 त्यासाठी गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली जाते. यामध्ये विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील उपचारांसाठी मदत दिली जाते. 

👉 पहा या योजनेविषयी आणखी

▪️ सुरुवातीला या योजनेचा लाभ घेण्यासाठी खूप धावपळ करावी लागत होती अशा वेळी होणारा त्रास कमी करण्यासाठी आता राज्य सरकारने या योजनेत आणखी सुधारणा केली आहे. 

▪️ आता आपल्याला अर्ज करण्यासाठी 8650567567 या नंबरवर मिस्ड कॉल दिल्यानंतर मोबाइलवरच अर्जाची लिंक मिळेल. त्याद्वारे अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह पाठवायचा आहे. 

▪️ मिस्डकॉल दिल्यानंतर अर्जाची लिंक एसएमसएसद्वारे मोबाइलवर मिळेल. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अर्ज डाउनलोड होईल. 

▪️ या अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह पोस्टाद्वारे किंवा स्कॅन करून पीडीएफ स्वरुपात cmrf.maharashtra.gov.inया मेलवर पाठविता येईल.
💥मुख्यमंत्री सहायता निधीत मोठा बदल झाला

Sunday, 16 April 2023

तुम्हाला माहितीये? PAN Card वरील १० नंबरांमध्ये लपलंय तुमचं नाव, जाणून घ्या?

तुम्हाला माहितीये? PAN Card वरील १० नंबरांमध्ये लपलंय तुमचं नाव, जाणून घ्या?
पॅन कार्ड  महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्डचा वापर आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या पॅन कार्डवर १० अंकी एक नंबर पाहिला असेल. त्यावर सर्व प्रकारची माहिती असते. या अंकांमधील माहिती आयकर विभाग ट्रॅक करत असते. हे लक्षात घेऊन विभाग प्रत्येक व्यक्तीला पॅन कार्ड जारी करतो. मात्र, पॅन कार्डवर लिहिलेले क्रमांक समजणारे किंवा ओळखणारे फार कमी लोक आहेत. आम्ही तुम्हाला पॅन कार्डवर लिहिलेल्या अल्फान्यूमेरिक नंबरचा अर्थ काय असतो ते सांगत आहोत.

अक्षरांमध्ये लपलंय तुमचं आडनाव:-

पॅन कार्डावर कार्डधारकाचं नाव आणि जन्म तारीख लिहिलेली असते. परंतु पॅन कार्डच्या नंबरमध्ये तुमचं आडनावही असतं. पॅन कार्डाचं पाचवं डिजिट तुमचं आडनाव दर्शवतं. इन्कम टॅक विभाग कार्डधारकाच्या आडनावालाच आपल्या डेटामध्ये नोंद करून ठेवतं. यासाठीच अकाऊंट नंबरपमध्ये त्याची माहिती असते. याची माहिती टॅक्स डिपार्टमेंट कार्डधारकाला देत नाही.

टॅक्सपासून क्रेडिट कार्डावर असते नजर:-

पॅन कार्ड क्रमांक हा १० अंकी खास क्रमांक आहे, जो लॅमिनेटेड कार्डच्या स्वरूपात येतो. जे लोक पॅन कार्डसाठी अर्ज करतात त्यांना आयकर विभाग ते जारी करतो. पॅनकार्ड बनल्यानंतर त्या व्यक्तीचे सर्व आर्थिक व्यवहार विभागाच्या पॅनकार्डशी लिंक केले जातात. यामध्ये कर भरणा, क्रेडिट कार्डद्वारे होणारे आर्थिक व्यवहार हे सर्व विभागाच्या देखरेखीखाली होते.

विभाग ठरवतो नंबर:-

 नंबरच्या सुरुवातीचे तीन डिजीट इंग्रजी अक्षरं असतात. हे AAA पासून ZZZ पर्यंत कोणतेही असू शकतात. सध्या सुरु असलेल्या सीरिजनुसार ते ठरवले जातात. विभाग आपल्या प्रमाणे ते ठरवत असतं. पॅन नंबरचं चौथं डिजीटही एक अक्षर असतं. परंतु ते कार्डधारकाचं स्टेटस सांगतं. यामध्ये चौथं डिजीट खालील पैकी काहीही असू शकतं.


*P - सिंगल पर्सन
*F - फर्म
*C - कंपनी
*A - एसोसिएशन ऑफ पर्सन 
*T - ट्रस्ट
*H - हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली
*B - बॉडी ऑफ इंडिविज्युअल 
*L - लोकल
*J - आर्टिफिशिअल ज्युडिशिअल पर्सन
*G - सरकारसाठी

पाचव्या डिजीटमध्ये आडनाव:-

पॅन कार्डाच्या पाचव्या डिजीट म्हणजे इंग्रजी अक्षरच असतं. ते तुमच्या आडनावाचं पहिलं अक्षर असतं. यानंतर पॅन कार्डात चार क्रमांक असतात. ते ०००१ पासून ९९९९ पर्यंत कोणतेही असू शकतात. तुमच्या पॅन कार्डाचे नंबर्स सीरिज दर्शवतात. याचं अखेरचं डिजीट एक अल्फाबेट असतं, जे कोणतंही लेटर असू शकतं. दरम्यान, आर्थिक व्यवहारासांठी पॅन कार्ड आवश्यक आहे. तुम्ही तुमचा पत्ता बदलला तरी पॅन कार्डाचा क्रमांक बदलत नाही. पॅन कार्ड हे एका आयडीच्या स्वरूपातही वापरू शकता.


आमच्या व्हाट्सअँप 👇 ग्रुप ला जॉईन व्हा

ह्या पोस्ट ला इथे 👇👇👇👇👇शेअर करा